Best 40+ Marathi suvichar by Swami Vivekanand

Swami Vivekananda was India's great spiritual Guru. Their lesson is very important for our personality and spirituality development. so, friends here we are publishing his best 40+ suvichar for students and young generation. These suvichar is very inspiring and motivational. And also can change your life.  You can also read Good thoughts in Marathi


Swami Vivekananda Suvichar

१. जुना धर्म म्हणत असे की, ज्याचा ईश्वरावर विश्वास नाही तो नास्तिक. परंतु नवा धर्म म्हणतो की ज्याचा स्वतःवर विश्वास नाही तो नास्तिक. 

२. विश्वास ! विश्वास ! विश्वास ! स्वतःवर विश्वास आणि ईश्वरावर विश्वास हेच महानतेचे रहस्य आहे. 

३. बल हेच जीवन होय. 

४. प्रत्येक कर्माचा उगम चिंतनातून, विचारातून होत असतो. म्हणून आपला मेंदू उच्च विचारांनी, सर्वोच्च आदर्शनी भरून टाकले पाहिजे. 

५. विश्वब्रम्हांडातील सर्व शक्ती आधीच्याच आपल्या आहेत, आपण स्वतःच स्वतःच्या हातानी डोळे झाकून अंधार अंधार म्हणून ओरडत आहोत. 

६. आत्मविश्वासाचा हा आदर्श सर्वच बाबतीत अत्यंत सहाय्यक असतो. 

७. माणसा माणसा मध्ये अंतर असण्याचे कारण हेच की, कुणामध्ये निःसीम आत्मविश्वास असतो आणि कुणामध्ये तो नसतो. 

८. जड जर शक्तिमान असेल तर विचार सर्वशक्तिमान आहेत. 

९. निःस्वार्थीपणामुळे खरोखर अधिक लाभ होतो. पण लोकांना हा गन अंगी बनवण्यासाठी अभ्यास करण्याचा धीर नसतो एवढेच. 

१०. स्वार्थीपणा हीच अनीती होय. निःस्वार्थीपणा हीच नीती होय. 


११. ध्यानात ठेवा की, आपले संपूर्ण जीवन हे देण्यासाठीच आहे. प्रकृती तुम्हाला देण्यास भाग पडेल. 

१२. पवित्र बनणे आणि दुसऱ्याचे हित करणे हेच साऱ्या उपासनेचे सार होय. 

१३. जीवन हे अल्पकाळ टिकणारे आहे. संसारातील असार सुखभोग क्षणभंगुर आहेत. दुसऱ्यासाठी जे जगतात तेच खऱ्या अर्थाने जिवंत असतात. 

१४. सर्व प्रकारचे प्रसारण म्हणजे जीवन. प्रत्येक जीव म्हणजे अव्यक्त ब्रम्ह होय. 

१५. मागा आणि तुम्हाला मिळेल. शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. ठोठवा म्हणजे तुमच्यासाठी दरवाजा उघडेल. 


१६. जगात असलेले भिन्न भिन्न धर्म वेगवेगळ्या उपासना पद्धती मानत असले तरी वस्तुतः ते एकच आहेत. 

१७. आपल्याला जीवन घडवणारे, माणूस निर्माण करणारे, चारित्र्य घडवणारे व चांगले विचार आत्मसात करणारे शिक्षण हवे आहे. 

१८. फक्त एकट्या आपल्यावरच साऱ्या कार्यांची मदार आहे. अशा भावनेने काम करा. 

१९. कुठल्याही स्वरूपात प्लारावलंबी झालेला माणूस सत्यस्वरूप भगवंताची उपासना करूच शकत नाही.  

२०. हातातील कार्य आवडते असल्यास ते कोणीही करू शकते परंतु खरा बुद्धिवान तोच की जो कोणत्याही कार्याला असे रूप देतो की, ते त्याच्या आवडीचे होऊन जाते. 


 २१. संघर्ष जीवनातला फार मोठा लाभ होय. 

२२. धैर्याने, शौर्याने पुढे चला. एखाद्या दिवसात वा एखाद्या वर्षात यश आपल्या पदरी पडेल अशी अपेक्षा बाळगू नका. 

२३. जीवनात यशस्वी होणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या ठायी चारित्र्याची प्रचंड शक्ती असते. 

२४. चांगल्या कार्यातील यशाचे रहस्य अनंत धीर. अनंत पावित्र्य व अनंत  हेच असते. 

२५. कोणतेही कार्य यशस्वी होण्या पूर्वी शेकडो अडीअडचणीतून त्याला जावे लागते. जे चिकाटी बाळगतात तेच लवकर म्हणा की उशिरा म्हणा यशस्वी होतातच. 


२६. उतावळा माणूस कधीच सिद्ध होऊ शकणार नाही. 

२७.भित्र्या लोकांकरिता हे जग नाही. पळून जाण्याचा प्रयत्न करू नका. 

२८. पवित्र आणि निःस्वार्थ बनण्याचा प्रयत्न करा. यातच सर्व धर्म साठलेला आहे. 

२९.आमचे मुख्य कर्तव्य हेच की, स्वतःची कधीही घृणा न करणे. 

३०. पुढे काय होणार या विचारानेच जे हैराण होतात त्याच्या हातून काहीही कार्य होणे शक्य नसते. 


३१. उपहास, विरोध आणि अखेर स्वीकार या तीन अवस्थांतून प्रत्येकच कार्याला आपली वाट काढावी लागते. 

३२. तू फक्त कमला सुरवात कर मग पाहशील इतकी शक्ती तुझ्यामध्ये की, ती सावरता सावरली जाणार नाही. दुसऱ्यासाठी एवढेसे जरी काम केले तरी ते आतली शक्ती जागृत करते. 

३३. कर्माच्या बाबतीत साध्याइतकेच साधनांकडेही लक्ष द्यायला पाहिजे. 

३४. सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. 

३५. जोवर वासना आहे तोवर खरे सुख प्राप्त होणे शक्य नाही. 


३६. इतर सर्व जण सुखी होवोत ही इच्छाच स्वतः आपण सुखी होण्याचा सुलभ उपाय आहे. 

३७. प्रेमामुळे समस्त इच्छाशक्ती प्रयत्न न करताच एकाग्र होऊन जाते. 

३८. अन्य सर्व गोष्टीपेक्षा दृढ निश्चयाचे बळ अधिक असते. 

३९. ज्या व्यक्तीने स्वतःची घृणा करण्यास आरंभ केला आहे. तिला अधोगतीचे दार सताड मोकळे असते. 

४०. आत्मश्रद्धा गमावणे म्हणजे ईश्वरावरील श्रद्धा गमावणे होय. 



Friends, Thank you for reading this post. We are grateful for sharing this inspirational and motivational suvichar. Swami Vivekananda was a great person and his thoughts are very useful for our personality development. so, please like and share these beautiful suvichar with your friends and family. 







Post a Comment

11 Comments

  1. खूप सुंदर आणि प्रेरणादायी सुविचार आहेत.

    ReplyDelete
  2. खूप सुंदर आणि प्रेरणादायी सुविचार आहेत.

    ReplyDelete
  3. wow this is awesome post you have shared with us.confusion Quotes
    joker quotes

    ReplyDelete
  4. Thanks for sharing such wonderful stuff. Keep sharing and keep up the good work.Your Lovequotesking.com.

    ReplyDelete
  5. Thankyou for this wonderful article. I regularly read your article, all are very amazing. Keep sharing such good info.

    birthday wishes in marathi

    anmol vachan

    comedy shayari

    ReplyDelete