Best 40+ Life Changing Suvichar in Marathi

friends, here we are publishing Best 40 life-changing suvichar in Marathi for students. Our purpose is spreading positivity in society. Suvichar is the best way of sharing good thoughts in our friend circles, society and in a school. Suvichar has own importance and very essential in our school life for our personality development. Following are Best 40 Marathi Suvichar for everyone and especially for students. 


Best 40+ Suvichar in Marathi for Changing our Attitude. 


1. घाम गाळल्याशिवाय मिळालेली सुख शांती टिकाऊ नसते. 


2. हिम्मत ही अंतःकरणातून निर्माण होणारी वस्तू आहे, आकड्यात निर्माण होणारी नाही. 


3. सामर्थ्य ही सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून , वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे.

4. आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे. 


5. भीरुतेवर आत्म्याचा शानदार विजय हाच पराक्रम आहे.


6. सामर्थ्यवान माणूस काम करीत राहतो. दुबळा माणूस बहुधा उपदेश करतो. 


7. निर्बलांना रक्षण देणे हीच बलाची खरी सफलता आहे. 


8. सामर्थ्य हा मनुष्याचा सर्वश्रेष्ठ गुण आहे.  


9. आजचा पुरुषार्थ उद्याचे भाग्य ठरणार आहे. 


10. बिन भिंतीची इथली शाळा लाखो इथले गुरु. 


11. अवदेशात सापडलेला मनुष्य आपल्या नशिबाला दोष देतो, पण स्वतःच्या कर्माचे दोष तो कधीच जाणून घेत नाही. 


12. अति कष्ट व संकटे सहन केल्यानंतर मनुष्य ज्ञानी व विनम्र बनतो. 


13. मनुष्य स्वतःच स्वतःच्या नशिबाचा शिल्पकार आहे. 


14. गर्वाने देव दानव बनतात, तर नार्मतेमुळे मानव देव बनतो. 


15. धाडसी लोकांना नशीब साथ देते. 


16. जेव्हा आम्ही नार्मतेमध्ये महान होतो, तेव्हा आम्ही महानतेच्या निकट जातो.

17. मनुष्याने आपल्या चरित्राचा आधार घ्यावा, नशिबाचा नव्हे. 


18. नशिबावर भरोसा ठेवून राहणे म्हणजे केवळ भेकडपणा आहे. 


19. धर्माचे सर्वात मोठे तत्व म्हणजे नम्रता होय. 


20. नम्रता म्हणजे अहंकाराचा नाश. 


21. लक्ष्याशिवाय मार्ग नाही, ध्येयाशिवाय जीवन नाही. 


22. उन्नत होणे आणि पुढे जाणे हेच प्रत्येक जीवाचे लक्ष असते. 


23. तुमचे धेय्य सतत तुमच्या नजरेसमोर ठेवणे हेच ध्येय सफलतेचे रहस्य आहे. 


24. ज्याच्या जीवनामध्ये निश्चित ध्येय नसते, त्यालाच वेळ घालवण्यासाठी साधन शोधण्याची गरज असते. 


25. स्वतःचे ध्येय हेच स्वतःचे जीवन कार्य समजा. प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा, त्याचेच स्वप्न पहा, आणि त्याचाच आधार घ्या. 


26. महान ध्येयाचे सृजन मौनामध्ये होत असते. 


27. कार्यशक्ती आणि इच्छा शक्ती प्राप्त करा, खडतर परिश्रम करा म्हणजे तुम्ही निश्चित ध्येयाप्रत पोहचू शकाल. 


28. अपयश नव्हे; पण निकृष्ट प्रतीचे ध्येय हाच गुन्हा आहे. 


29. ध्येय जितके महान तेवढा त्याचा मार्ग ही लांब व खडतर असतो. 


30. एका ध्येयाने बांधलेले कोठेही गेले तरी ते जवळच असतात.


31. धैर्य आणि पुरुषार्थाच्या जोरावर आपण जे प्राप्त करू शकतो ते शक्ती व घाईगडबडीने प्राप्त करू शकत नाही.

32. धैर्य म्हणजेच मनुष्याजवळ असणारे खरे शौर्य.

33. धैर्यासारखे बळ  नाही.


34. जे धैर्यवान आहेत तेच स्वतःचे नियत कार्य निश्चितपणे करू शकतात. 


35. सत्य आणि न्याय याहून कोणताच धर्म मोठा नाही. 



36. ज्याप्रकारे घरासाठी पायाची जरूर असते, त्याप्रमाणे मनुष्य जिवनासाठी धर्माची आवश्यकता असते.


37. धर्म ही अफूची गोळी आहे. 


38. लीनता व विनयशीलता ह्या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत. 


39. ज्याचे मन निरंतर धर्मरत असते त्याला देव देखील नमस्कार करतो. 


40. मानसिक समाधानालाच संतांनी खरी संपत्ती म्हटले आहे.





Thank you for reading this post. We are very grateful for doing this work of sharing good thoughts. Every suvichar is a life lesson and can change our lives. so, please like and share this post with your friend and family. 

Post a Comment

2 Comments